सौंदर्य आणि फ्ँशन
सौंदर्य आणि फ्ँशन
1 min
380
हुरहुर मनी लागे
नयनाला गोड भासे..
खुले सौंदर्य जे तुझे
परे कल्पनाच्या दिसे...
परिधान हा पेरवा
रंग रंग तू गुंफला..
अगं बाई हा जमाना
फँशनेबल रे झाला..
उंची उंची ती सँडल
जिन्स आली आता अंगी..
थोडे थोडे ते फाटके
कपडे, दिसे हो अंगी...
सौंदर्य आणि फँशन
तुझ्यापाई दोन्ही दिसे .
किती शोभे तू अप्सरा
मनात माझ्या तू वसे...
आता वेडा पिसा झालो
काय वेगळे गं सांगू !
सौंदर्य आणि फँशन
तुझे जग लागे बघू !!
