STORYMIRROR

कपिल राऊत

Tragedy

3  

कपिल राऊत

Tragedy

सायलेंट व्हॅलीतला सायलेंट

सायलेंट व्हॅलीतला सायलेंट

1 min
11.6K

सायलेंट व्हॅलीमध्यल्या त्या अननसाने तुला 

अख्खं उध्वस्त करून टाकलंय

अन् मानवी मेंदूची बिमारी समोर आणुन दिलीस..


तुझी हि जलसमाधीची भुमिका

अन् डोळ्यात साचणारं पाणी

थांबवणं जरा मुश्कील होऊन जातं..


निरागस पणाची भुमिका घेऊन 

तु त्या पाण्यात शेवटच्या श्वासापर्यंत 

लढत राहिलीस 

तुला राग कसा आला नाही? या मानवप्रवृत्तीचा..


तुझ्या गर्भावस्थेवर या मानवहिनतेला

दया आली नाही

तु पाण्यात डोकं खुपसुन निश्चल राहिली 

जलसमाधी घेताना..


तुला पाण्याच्या बाहेर 

यावेसे वाटले नाही.!

तुला मानवावर विश्वास 

ठेवावा वाटला नाही.!


तुझ्यावर झालेल्या अन्यायाला

लाचार असलेल्या या मानवजातिला

तु दाखवलेला मानवी कृतीचा

हा निषेध योग्यच होता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy