STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

सायकल (सहाक्षरी)

सायकल (सहाक्षरी)

1 min
11.6K

जुनी सायकल 

आलीय स्वप्नात 

फुटलेत पंख

सांगते कानात


किती जिवापाड 

सांभाळले तिला 

सायकल विना 

करमेना मला


दुचाकी वाहन 

घरी मग आले !

कशी सायकल

बाजूला ठेवले !!


आरोग्यासाठीच

सायकल छान 

प्रदूषण नाही

मिळवते मान


Rate this content
Log in