सायकल माझी
सायकल माझी
1 min
168
सोनपरी ती जीवनातली
खूप वाट पाहून मिळाली
तिला पाहून मजा आली
अशी सायकल माझ्या घरी आली
प्रथम चालवली कैची
मित्रांना लागली मिरची
तिची सीट माझी खुर्ची
तिच्यावर चालत होती माझी मर्जी
कधी शर्यत रस्त्यावर
कधी केली जंगल सफारी
शाळेला दांडी मारून सिनेमाची वारी
तीच माझी लालपरी
