सावली
सावली


मैत्रीत तिच्या या ती माझी सावली !
एक रात्र उशाशी बसून असते
कितीही जागली तरी साथ देते
दिसाच्या प्रखर तेजाने घायाळ मनाला
जणू रातित चांदण्यांतील शितल गारवा
झुरलेल्या मनाला एक निवांत पणा
आसुयेच्या गाभार्यात एक आशेचा दिवा
एक रात्र उशाशी बसून असते
कितीही जागली तरी साथ देते
काय देवू नाव तिला सावली की मैत्री
जगते श्वासात अन उरते ही मनात ती
कितीही असले सख्खे नाती..
पण जिवाला जीव देणारी मैत्रीच खरी
एक रात्र उशाशी बसून असते
कितीही जागली तरी साथ देते
एक रात्र उशाशी बसून असते
कितीही जागली तरी साथ देते
हरुन जाता श्वास मी ही ती कधी प्राणवायू
मैत्रीत तिच्या या ती माझी सावली