सावली
सावली

1 min

11.7K
सावली
एक तेजाचे वलय
कधी शाश्वत तर कधी क्षणिक
अस्तित्व तुझ हे अंधारलेलं
अगतिक असतं हे प्रकाशापुढे
अंधरातल्या भावना गुढ याचे वलय ओढून
तुझ्या रूपाने नाचतायेत
तेव्हा अगतिकपणाने
आठवण येते त्या प्रकाशाची
जेव्हा हा आपल्या भास व आभासाचा
लपंडावाचे खेळ असह्य होतो
तेव्हाच एक प्रकाशाचा किरण
तुझं अस्तित्व पुसायला सज्ज होतो
असे हे प्रकाशावर अवलंबून
तू किती दिवस जगणार
आता तुला स्वतःच्या तेजाने तळपायाला हवे
इतरत्र दिसणाऱ्या सावल्या गिळायला मलाच पुढे
व्हावे लागणार घेऊन एक तेजाचे वलय