STORYMIRROR

Sangeeta GodboleJoshi

Others

4  

Sangeeta GodboleJoshi

Others

सावित्रीमातेस ..

सावित्रीमातेस ..

1 min
174

एका स्त्रीचं हे असं जिवंत रहाणं ..

मरणानंतरही ..

युगानुयुगे..

अख्खी सुशिक्षित स्त्री जात ऋणी राहील ..


सतत स्मरण राहील ..तुझ्या वेदनांचं ..खाल्लेल्या खस्तांचं ....

अन् धैर्याने तू ज्या पद्धतीने तुझ्या विरुद्ध लढणाऱ्या समाजपुरुषाशी दिलेल्या झुंजीचं...

 

आज आम्ही ताठ मानेनं जगतोय ..स्वतःतला 'स्व' जपतोय ..

याला कारणीभूत ..

तू आहेस ...

आम्ही कसं फेडावं हे पांग ?

तुझ्या भाळावरच्या लालबुंद चिरीनं ..

अन् त्या चिरीच्या मालकानंही दिलेली

अनमोल साथ विसरलो नाही आम्ही ..

आमच्या ललाटरेषेचं पुनरुत्थापन केलस ..

शिक्षणाची महाद्वारं उघडी केलीस ...

अन् कोणत्याही क्षेत्रात मागे नं रहाण्याचं

आमचं स्वप्न पुरं केलस ..

मुळात तसं स्वप्न पहायचं असतं ..

हेच मुळी तुझ्यामुळे कळलं आम्हाला ...

जातीपातीच्या पलीकडे जाऊन

स्त्री लाही तिच्या कवटीत मेंदू असतो

नि त्याचा वापर करुन क्षितीजं पार करता येतात .

.हे तूच सांगितलंस ..मूकपणानं ..


सावित्री माते ..नुसत्या तुझ्या स्मरणावर नं थांबता

.तू पेटवलेली मशाल ..

तशीच धगधगत ठेवू असं वचन देतोय आम्ही ....

तुझ्या लेकी ...

सुशिक्षितपणाचं लेणं बाळगताना

सुसंस्कृततेचही प्राणपणानं रक्षण करु ..

तू दिलेला सामर्थ्यशाली वसा ..

नं उतता मातता जतन करु .

स्त्री ही अबला नसून सबला आहे ..असते..

या इतिहासानंदेखील सिद्ध केलेल्या गोष्टीचं स्मरण ठेवू.

तू पेटवलेली क्रांतीज्योत ..

आमच्या वाटचालीत सतत प्रकाश देत राहील यात शंकाच नाही ...



Rate this content
Log in