सावित्रीमाई ( सहाक्षरी )
सावित्रीमाई ( सहाक्षरी )
1 min
192
हो सावित्रीमाई
तुमच्यामुळेच
हा महिलादिन
भाग्य पाहण्याच
तुमचा तो लढा
या महिलांसाठी
मैलाचा दगड
नव्या पिढीसाठी
वर्षाव दगड
तीच शेण फेक
झेलली सदैव
हारले ते कैक
पतीची ती साथ
अभिमान ज्योती
तुम्ही कल्पतरू
स्त्रीया बहरती
तो खंबिरपणा
तुमच्याच ठायी
नतमस्तक हो
तुमच्याच पायी
