साथ देशील मला
साथ देशील मला

1 min

290
सखे या माझ्या खडतर वळणावरी
साथ तू मला देशील ना?
झेप घेण्या उंच आकाशी
पंख माझे होशील ना?!!धृ!!
हेची मागणे माझे होते
सहवास मला तुझा हवा होता
क्षितिजापलीकडे सांज ढळता
तुझा हात हाती हवा होता
सखे या खडतर वळणावरी
साथ तू मला देशील ना?!!1!!
सोबत तुझी हवी मला
मनातले कीलमिष दूर करूनी
जवळी घे मला जरा
सखे या माझ्या खडतर वळणावरी
साथ तू मला देशील ना?!!2!!