Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

Suvarna Patukale

Others


4.0  

Suvarna Patukale

Others


सारे जण प्रवासी येथे

सारे जण प्रवासी येथे

1 min 174 1 min 174

सारे जण प्रवासी येथे येती न् जाती दूर

वळणा वरती परतून येतो आठवणींचा पूर

सारे जण प्रवासी येथे

बालपणी चा काळ सुखाचा

दुडू दुडू मागे पळताना

कधी संपला हे ही न कळले

वाटेवर त्या वळताना

तरुणपणी हे फुलपाखरू

आळवित येईल सूर

वळणा वरती परतून येतो आठवणींचा पूर

पडती गाठी कधी कुणाच्या

अश्रू झरती तुटताना

ओंजळ भरते कधी फुलांनी

कुणी संपते लुटताना

बहर हरवतो अवचित सारा

नियती होते क्रूर

वळणा वरती परतून येतो आठवणींचा पूर

प्रवास खडतर आयुष्याचा

सोसून सारे घाव

बनेल मूर्ती, घडेल किर्ती

गंधीत होईल नाव

अंती दिसशील हसताना तू

आनंदातच चूर

वळणा वरती परतून येतो आठवणींचा पूर


Rate this content
Log in