सांजवेळ
सांजवेळ
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
46
सांजवेळी मनात हुरहूर दाटते,
सय सख्याची काहूर माजवते...।।धृ।।
कुठे हरवले सारे ते,
जे माझ्या मनात होते..!
किती स्वप्न पाहिले अन,
कल्पनेत जग आणले होते...!
आठवांच्या त्या डोही मग,
मन चिंब-चिंब भिजते..!
पानांआडून फुलांचे ते,
असे काय सजणे होते..!
सांगायचे तुलाही होते,
तरी टाळले ते तूही होते..!
तमाम वेली-जातींनाही,
सांजवेळी झुरणे होते...!
जे होते हवे तुला ते,
'प्रेम' मजकडेच होते...!!
म्हणूनी....,
सांजवेळी मनात हुरहूर दाटते,
सय सख्याची काहूर माजवते..!