सांगू कशी प्रिया तुला
सांगू कशी प्रिया तुला
1 min
413
माझ्या मनातील भावना
अधीर झाले मन माझे
भेटाया तुज अधीर झाले
सांगू कशी प्रिया मी
दिवस सरला येते सांजवेळ ही
आठवण तुझी मनातून जात नाही
समजून मजला घे ना
सांगू कशी प्रिया मी
कशी सांगू सांग ना प्रिया
माझा कंठ दाटूनी आला
सहन नाही होत हा विरह आता
कासावीस झाला जीव माझा वेडापिसा
