STORYMIRROR

Sanjay Gurav

Others

3  

Sanjay Gurav

Others

सांगायचे राहून गेले

सांगायचे राहून गेले

1 min
253

जुळल्या मनाच्या तारा सांधायचे राहून गेले

मनापासून मनात तुझ्या घर बांधायचे राहून गेले.

वाळूवर चित्र जपलेले संशयाच्या लाटेने वाहून गेले

सुटण्याआधी हातावर नाव गोंदायचे राहून गेले.

रुजविला मळा प्रेमाने पाणी शेंदायचे राहून गेले

गैरसमजाचे वाढले तण तेव्हा निंदायचे राहून गेले.

ओंजळीत होती फुले वेणीत माळायचे राहून गेले

नुसताच होतो प्रेमात पुरते भाळायचे राहून गेले.

स्फुरल्या मनात कविता डायरीत मांडायचे राहून गेले

होते सांगण्यासारखे खूप काही सांगायचे राहून गेले.


साहित्याला गुण द्या
लॉग इन