Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suresh Kulkarni

Others

3  

Suresh Kulkarni

Others

सांगा नीटपणे

सांगा नीटपणे

1 min
89

अहो सांगा नीट सांगा

सांगा ठाम सांगा

तुम्ही माझ्या बाजूचे

आहात की नाही ?

असेन मी इथेही 

असेन मी तिथेही

असे गुळमुळीत काही

मुळीच चालणार नाही !

जाणतो मी जोखतो मी

आपला कोण कोण परका

दगा जर द्याल तुम्ही

मी ही खूपच बेरका !

लावून ठेवीन वाट अशी

नाही इथले नाही तिथले

पडाल तोंडघशी !

तुम्ही पडाल तोंडघशी !

खेळू नका माझ्या भावनांशी

सांगा नीट सांगा

रहाल ना एकनिष्ठ

तुम्ही माझ्याशी ?

Rate this content
Log in