STORYMIRROR

Ganesh Punde

Others

3  

Ganesh Punde

Others

सांगा कसं जगायचं...?

सांगा कसं जगायचं...?

1 min
29.1K


सांगा कसं जगायचं...?

शेतकरी शेतकरी म्हणून

 तुम्ही कर्जमाफी मागायचं

अन तुमच्या शेतात राबणारे 

आम्ही सांगा कसं जगायचं ..?


दसकटाच्या रोजगारावर 

आम्ही सण साजरे करतो

उन्हा तान्हात कष्ट करून

पोराबाळाचे पोट भरतो

कष्टाचे जीवन आमचे

आम्ही कोणाला सांगायचं

अन तुमच्या शेतात राबणारे

आम्ही सांगा कसं जगायचं...?


निसर्गाचा कोप झाला आणि

वनवास आपल्या नशिबी आला

कर्जबाजारी झालात तुम्ही आणि 

पडलाय आमच्या पोटावर घाला

सरकार देत मोबदला तुम्हाला 

आम्ही कोणाला मागायचं

अन तुमच्या शेतात राबणारे

आम्ही सांगा कसं जगायचं...?


पोरं शाळेत जातात आमची 

म्हणतात मोठे साहेब होणार

घर नाही राहायला आम्हाला 

मग कर्ज कोण देणार

तोडक्या मोडक्या कमाईवर

घर कसं भागायचं

अन तुमच्या शेतात राबणारे 

आम्ही सांगा कसं जगायचं..?


तुमच्या सारखा आम्हालाही

घ्यावं वाटते बघा फाशी

पण मीच घरचा कर्ता पुरुष

पोर का मारू उपाशी

कष्टकरी आम्ही शेतमजूर

सांगा कोणाकडे बघायचं

अन तुमच्या शेतात राबणारे 

आम्ही सांगा कसं जगायचं...?

सांगा कसं जगायचं......!


Rate this content
Log in