सांग सांग कोरोना
सांग सांग कोरोना
सांग सांग कोरोना
शाळा आमची कधी भरणार
शाळेभोवती मित्र जमवून धिंगा
मस्ती आम्ही कधी करणार
सांग सांग कोरोना।
कोरोना कोरोना खर सांग एकदा
सुट्टी संपून लवकर वर्ग भरेल का
वर्ग भरून बाई शिकवतील , आता मी त्रास नाही देणार त्यांना
कोरोना कोरोना।
कोरोना कोरोना घरी बसून बोर झालं आता।
हसायचे खेळायचे दिवस चालले
उरली नाही मजा।
मॅडम पण आमची रोज आठवण काढतात।
Online शिकवण्यात मजा नाही अस म्हणतात।
त्यांची आम्हाला शिकवण्याची तगमग कळू देना रे तुला।
कोरोना कोरोना।
कोरोना तू खूप त्रास आम्हाला दिला।
शाळा ,मित्र, शिक्षक, खडू ,फळा
सगळ हिरावून काय मिळालं तुला
शाळेचा आम्हाला लावून लळा।
सांगना आमची कधी भरेल शाळा
कोरोना कोरोना।
