STORYMIRROR

Bipin More

Others

2  

Bipin More

Others

सांग माधवा

सांग माधवा

1 min
4

जीवनभर सोबत करशील ना

थांबून ...नवे श्वास भरशील का


सुकलेल्या जमिनीत उगवशील ना 

आटलेल्या विहीरीत बरसशील का

गरीब,आश्रित मुक्या लाचारांना

आपलेच म्हणून कुशीत घेशील का 


पूरात पाय घट्ट रोवशील ना

अंधारात हात धरशील का 

केल्या चुका सांभाळताना आमच्या 

आधी चूक की बरोबर न्याय करशील का 


मंदिरात, पाठपुजेत नाही रमलो तुझ्या 

तरीहि तुझ्यावरचा माझा हक्क कायम ठेवशील ना 

सुदाम्यासाठी न बोलता आलास तसा

माझ्यासाठी बोलावून तरी येशील ना


रूक्मिणीनी हट्ट केला तर मात्र थांबशील ना

तुझाही संसार आहे त्यात लक्ष देशील का 

आपण दोघं असलो तरी एकच आहोत

पावलोपावली त्याची आठवण करशील का???


Rate this content
Log in