सांभाळून घेशील ना?
सांभाळून घेशील ना?
1 min
264
तिला तिखट मिसळ आवडायची
मला पाणीदार झालेले तिचे डोळे
तिचे असायचेत आडाखे तंतोतंत
माझे बिचारे आभासच वेडे खुळे
एकदाही मला नाही म्हणाली
"हवे ते देशील ना ?"
हवे ते घ्यावयाची हिंमत कुठे
मी बावरलो की तीच सावरायची.
स्वतःस सावरायला जमले नाही
तिला सावरुन घेता आले नाही
निसरड्या वाटेवरचे दोन प्रवासी
तोल मात्र कधी कसलाच गेला नाही.
"अजिंक्य" ती एकदाच हरली
काय जाणवलं अन मागे फिरली
हात सुटतोय वेड्या 'साथ ' नाही
"सांभाळून घेशील ना" इतकेंच म्हणाली.
.....मी आजही सांभाळतोय...
तिच्या "शब्दाला".
