सामना
सामना

1 min

21
मिटून पापणी डोळ्याची
सूर गवसला काळजीचा
सुटून बंध रेशमाची
तारा तुटला आशेचा!
पाउले पड़ती पुढची
नित्यनेमाने पाहण्याचा
आसमंत आठवणीची
सूर गवसला गाण्याचा!
काळजीत जीव लावण्याची
सराव होताच गाण्याचा
नव निर्मिती काळजीची
अभ्यास करावा नित्याचा!
निसर्गात आहे भरगच्ची
आवाज नावीन्याचा
पसंती काळजीची
अन उल्हास कार्याचा!
आवाज गायकी कोकिळेची
सूर भरला गाण्याचा
साथ तंबोराची
सामना साहसाचा!