Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Medha Desai

Others

3  

Medha Desai

Others

सामाजिक विषय

सामाजिक विषय

1 min
354


स्त्रियांचा अनादर केल्यावर

पुरूषप्रधान संस्कृती दिसते

बलात्काराची बातमी ऐकल्यावर

सामाजिक बांधिलकी असते  १


हुंडाबळी,भृणहत्या,अत्याचार

सामाजिक विषय आहेत सारे

सर्वांनी शिक्षणाचा ध्यास घेतल्यावर

मनपरिवर्तनाने येतील सुखाचे वारे २


अंधश्रद्धा,रूढी परंपरांचे जोखड

नवीन विज्ञान,तंत्रज्ञानाने तोडून टाकावे

वाचनासारखा एखादा छंद जोपासून

प्रगल्भ विचारांनी समाजपरिवर्तन करावे ३


व्यसनाधीनता साऱ्या समाजाला पोखरते

शारीरिक,आर्थिक नुकसानच करते

डोळस श्रद्धा,भक्तिभाव ठेवल्याने

जीवन सुखानंदाने नेहमी भरते ४


दानधर्म,सेवाभाव,माणुसकीने रहावे

जातीभेद,दंगेधोपे नेहमी टाळावे

सर्वांनी मिळून एकोप्याने रहावे

सामाजिक विषय सर्वांनी मिळून हाताळावे ५


शेतीप्रधान देश,महागाई,वेगवेगळी संकटे

साऱ्यांवरच मात करायची असल्यावर

सरकारही सुशिक्षित,दमदार येण्यासाठी

अवलंबित्व येते लोकांच्या मतदानावर ६


माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्यावर

प्रत्येक सामाजिक विषयाशी तो बांधील असतो

पण प्रत्येकाला जीवन जगण्याचे बांधिलकी म्हटल्यावर

सगळीकडे अंदाधुंदी,मतलबीपणा भरलेला दिसतो ७


Rate this content
Log in