सागरगाथा
सागरगाथा
1 min
294
फेसाळतो
उधाणतो
आपुल्याच
तोऱ्यात तो
तो विषय
कवितेचा
प्रियकर
सरीतेचा
जलधि तो
तो सागर
नाम त्याचे
रत्नाकर
अंतरात
लपवले
मोती,शंख
नि शिंपले
सजीवांचा
रहिवास
मीठ, मासे
देण खास
कोळी त्यास
भजतात
श्रीफळही
अर्पितात
हळू येतो
काठावरी
गुदगुल्या
पाया करी
जरी होता
क्रुद्ध फार
माजवितो
हाहा:कार.
