साधेपणा
साधेपणा
1 min
24
साधेपणा असावा आपल्या विचारात जो असेल
प्रत्येकाच्या मनाला भिडणारा
साधेपण असावा आपल्या स्वभावात जो असेल
प्रत्येकाच्या मनात घर करणारा
साधेपणा असावा आपल्या वागण्यात जो असेल
प्रत्येकाला समजून घेणारा
साधेपणा असावा आपल्या बोलण्यात जो दिसेल
प्रत्येकाला कृतीतून न सांगता ही स्पष्ट जाणवणारा..