रूपे...
रूपे...
स्त्री जन्मा तुझी किती रूपे
प्रत्येक रूपात तू सजते...
मुलगी, आई, बहीण, मावशी, मामी,
सासू, पत्नी, नणंद प्रत्येक नात्यात तू खुलते...
कधी असते तू विद्यार्थ्यांना घडवणारी शिक्षिका...
तर कधी जिव वाचवणारी डाॅक्टर...
कधी गुन्हा थांबवणारी पोलीस...
तर कधी अन्नपूर्णेची सेवा करणारी मोलकरीण...
कधी असते डोक्यावर दगड उचलणारी मजूर...
कधी असते तू शांत प्रेमळ मायाळु
तर कधी अन्यायाविरुद्ध लढणारी नारी...
इतिहास ही तु गाजवला
झाशीची राणी, हिरकणी, आनंदीबाई, सावित्रीबाई फुले, कल्पना चावलासारख्या नावांनी स्त्रीला सन्मान दिला...
