रुजवण (सहाक्षरी)
रुजवण (सहाक्षरी)
1 min
206
बिजे संस्काराची
अशी रुजवावी
संस्कारी ती पिढी
हातून घडावी....१
बोले तैसा चाले
पाऊले वंदावी
आचरण तसे
विद्यार्थी ही दावी....२
करण्या विकास
आस ती धरावी
शाळा समाजास
आपली वाटावी....३
होतील शिक्षित
सुशिक्षित व्हावी
आदर्श आपले
मस्तकी ठेवावी.....४
सदा रुजवण
विचारांची ठेवी
विवेक बहर
पालवी हसावी ....५
