STORYMIRROR

Sunita Anabhule

Others

4  

Sunita Anabhule

Others

ऋतू वसंत फुलला

ऋतू वसंत फुलला

1 min
518

ऋतू वसंत फुलला,

फुलला तो गंधाळला,

गंधाळला रंगी न्हाला,

न्हाला परी मोहरला।।1।।


उधळण ती रंगाची,

पानगळ स्वागताची,

सुरुवात उन्मेषाची,

चाहूल ती वसंताची।।2।।


वसंताची ही किमया,

किमया नववधूची,

नववधुची परीक्षा,

परीक्षाच संसाराची।।3।।


ऋतूंचा राजा असतो,

धरणीस सजवतो,

सृजनास फुलवतो,

प्रणयास खुलवतो।।4।।


खुलवतो तारुण्यास,

तारुण्यास मोहवितो,

मोहवितो अधरांस,

अधरांस खुलवतो।।5।।


जीव होई कासावीस,

जगण्याच्या उमेदीस,

नवचैतन्याची आस,

ऋतू वसंत ये खास।।6।।


Rate this content
Log in