ऋतू (सहाक्षरी)
ऋतू (सहाक्षरी)
1 min
188
उन्हाळा उन्हाचा
मग पावसाळा
हिवाळा तिसरा
ऋतू ते वर्षाला.....१
उन्हाळा गर्मीचा
खादीच वापरा
पोटभर पाणी
विश्रांती दुपारा......२
पावसाच्या सरी
रेनकोट शोधा
नाहीतर खोला
रंगीत छत्रीला.......३
हिवाळ्यात थंडी
स्वेटरची मजा
कान टोपी घाला
मफलर लावा......४
ऋतूचे चक्र हे
आहे सुरू पाहा
प्रत्येक ऋतूत
करावी हो मजा......५
