ऋतू हिरवा
ऋतू हिरवा
1 min
34.9K
ऋतू हिरवा बहरून आला
मृग नक्षत्री असा सारा
शाल मखमली हिरवी पांघरून
अवनी सजली निवांत वारा
सरसर येती जलधर नभीचे
तन वसुंधरेचे भिजवी सारे
पशु पक्षी सृष्टीच न्हाहली
आनंदाने गाऊ चला रे
तन भिजले मनही भिजले
हर्षाने डोले पिक कोवळे
अवखळ वारा गात राही
हर्षोल्हासाचे उमटे मनी सोहळे
