STORYMIRROR

Swarup Sawant

Others

0.9  

Swarup Sawant

Others

ऋतू हिरवा ऋतू बरवा

ऋतू हिरवा ऋतू बरवा

1 min
2.8K


वसुंधरा नटली जणू नवी नवरी

पाने फुले बहरली आल्या मृगसरी ।

मोर नाचे आनंदे वाजंत्री जणू वाजे

बेडकांच्या आवाजाने लय सूर साजे।

विजेचा प्रकाश ढगांचा गडगडाट

पावसाच्या आगमने हा सृष्टीचा थाट ।

मानवा सांगे जणू हा जीवनाचे सार

मनमुराद जगून हद्द कर पार॥


Rate this content
Log in