STORYMIRROR

Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

*रोप*

*रोप*

1 min
14.1K




छोटेसे एक छानसे

लावले सुरेख मी रोप

त्याला घातले खत

वार्‍याने मग लागली झोप....


पावसात हे रोप

मस्त खेळत राही

इकडून तिकडे

छान डुलत पाही...


हळूच फुटली पालवी

पाने वर डोकावली

पानाआडून मग

चमकली सूर्याची लाली....


पानातून मग हसली

एक सुंदर कळी

कळी म्हणाली पानांना

अळी मिळी गूपचिळी...


रोप झाले मोठे

त्याला फुलली फुले

फुलांनी सजले रोप

फूल वार्‍यावर डुले....


जादू आहे रोपात

मस्त हिरवाईची

फूल फूल पानात

शोभा वाढली वसुंधरेची....


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ