ऋण मातीचे चला फेडू धुळीवंदन कर
ऋण मातीचे चला फेडू धुळीवंदन कर
करू साजरे हे सण सोहळे जोशात
जोशात धुळीवंदन करून खेळू रंग
रंग उधळूनी एकजुटीने राहूया सारे
सारे भारतवासी होऊच प्रेमात दंग
दंग होऊ खेळताना विविध हे सण
सण होळीचा झालेय वसंतागमन
वसंतागमन होताच फुलला निसर्ग
निसर्गातल्या वृक्षांचे करू संवर्धन
संवर्धन वसुंधरेचे करूया वृक्षारोपण
वृक्षारोपण करून टळेल मृदेची धूप
धूप टाळूनी पिकवू शिवारात मोती
मोती पिक
वून मिळतील पैसेही खूप
खूप आनंदाने जगूया आपले जीवन
जीवन सुखाचे होईल विकसित देश
देश समृद्ध होऊन वाढेल राष्ट्राचा मान
मान सन्मान होऊन संबंध ठेवेल विदेश
विदेशी पाहुणे पर्यटक मिळेल चलन
चलन मिळूनी उद्योगात करूया प्रगती
प्रगती करता देशाचा होईलच विकास
विकास होताच राष्ट्राचा बदलूया नीती
