STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

रंगला शब्दखेळ

रंगला शब्दखेळ

1 min
427

अवचित प्रतिभेची

आली झुळुक वेगाने

मन गेले बावरुनी

शब्द प्रांगणी आल्याने  (१)


अर्थवाही शब्दांमधे

केली यमकयोजना

जमे अष्टाक्षरी छान

मोद शब्द जुळताना  (२)


कधी उपमा , उत्प्रेक्षा

अलंकारे सजविले 

शब्द शब्द पारखुनी

कवितेला नटविले   (३)


कधी अनुप्रास , श्लेष

शब्दलेणे लाभल्याने

हर्षभरे पानावरी

कवितेचे साकारणे   (४)


रास जुळल्या शब्दांची

जडविते काव्यपंक्ती

हासे सुंदर कविता

वंदूनिया सरस्वती   (५)


शब्द संपत्ती कवीची

खेळ शब्दांचा मांडला

अर्थ शब्दांना लाभला

सजे मखर काव्याला  (६)


Rate this content
Log in