रंग
रंग
रंग रंग माझा वेगळा मी माळत होते गजरा
गालावरती रंग गुलाबी लपवते लाजरा चेहरा
रंग माझा केतकीचा सुगंध दरवळलेला
चाहूल लागता प्रियाची माझा जीव भांबावलेला
रंग माझा मोगऱ्याचा घरभर सुवास त्याचा
एक क्षणही जाईना विचार तुझ्या येण्याचा
रंग माझा निशिगंधेचा तिन्ही सांजेला घुमला
करूनी साजशृंगार वाट पाहुनी जीव दमला
रंग माझा लाजाळूचा तू दिसता लाजून गेला
रुसवा फुगवा क्षणात माझा तुझ्या प्रेमाने जिरला
रंग माझा कस्तुरीचा मिठीत तुझ्या मी येता
भाव दाटले तनामनामध्ये प्रभातीचा प्राजक्त उमलता
रंग माझ्या मिलनाचा सखी तुला सांगू कशी येता
प्रियतम् घरी होते मी ग वेडीपिशी
रंग आमच्या प्रेमाचा ठेवा जन्मोजन्मीचा
रंगात रंगले मी प्रियाच्या जसा श्याम राधिकेचा
