भाषा डोळ्यांची
भाषा डोळ्यांची
1 min
558
मी पाहिली तुझ्या डोळ्यात अबोल प्रतिमा
माझी नजरेस नजर भिडता माझ्याही डोळ्यात होती प्रतिमा
तुझी डोळ्यांची भाषा डोळ्यांना कळली नकळत हृदयाची स्पंदने जुळली
मनाने मनाला साद घातली ओठांच्या स्मित हास्याने दाद दिली
हातांनी हाताची मैत्री केली अलगद प्रीत काळजात फुलली
स्वप्नांची मग मैफिल भरली भावना मनातली जणू व्यक्त झाली
उघड्या डोळ्यांचे ते प्रेम आंधळे सुखदुःखाशी नाते जुळले
भविष्याचे ना विचार सुचले कळेच ना प्रेम हे कसले जुळले
जन्मोजन्मीचे नाते संसाराचे जे स्वप्न फुलविले
माप ओलांडून त्याचीच झाले नावाला हि नाव जोडले अमर असे हे प्रेम घडले
