स्वप्नांच्या हिंदोळ्यावर
स्वप्नांच्या हिंदोळ्यावर
स्वप्नांच्या हिंदोळ्यावर शोधात होते मी सुखाच्या
सुख नेमके म्हणावे कशाला होते मन प्रेमात कोणाच्या
आई वडिलांचे अनमोल प्रेम पुरवलेले त्यांनी माझे सर्व हट्ट
भाऊ बहिणीचे गोड भांडण नाते रक्ताचे बनलेले घट्ट
बहरत्या वयात भेटलास तू आणि सुखाचे बदलले गणित
डोळ्यांची भाषा लागली समजू गुंफू लागले भविष्य तुझ्या समेत
फुलू लागली प्रेमाची बाग रोज स्वप्नांना नव्याने यायची जाग
तुझ्यासोबत मिळायचे स्वर्गसुख अचानक लागली माझ्या सुखाला आग
कुठे हरवलो दोघे या कर्तव्यात झोकुन दिले आयुष्य अनोळखी बंधनात
आज अचानक आलास स्वप्नांच्या हिंदोळ्यात सुख सापडले तुझ्या प्रेमाचे अतोनात
