STORYMIRROR

Pradnya Sonali Dhamal

Others

3  

Pradnya Sonali Dhamal

Others

स्त्री जीवन

स्त्री जीवन

1 min
313

त्यादिवशी खूप खुशीत चार मैत्रिणी निघालो फिरायला

अचानक दिसली रस्त्यात एक मुलगी

बघून आम्हाला लागली घाबरायला

जवळ तिला घेतले दुःख तिचे ऐकले

घर सोडून पळाली होती ज्याच्याबरोबर

हौस भागवून सोडले होते तिला रस्त्यावर

सैरभैर होऊन ती निघाली होती नदीवर

आणले तिला घरी मी विश्वासाने

समजून सांगितले आयुष्याचे गाणे

तिच्या घरच्यांशी संपर्क करून दिले

तिला घर मिळवून घरच्यांनी दिले लग्न तिचे लावून

छान संसार तिने आता दाखवला करून

करते मला फोन मधून अधून

वाटते समाधान मला कि पुण्य घडले आपल्या हातून

म्हणून सांगते तरुण मुलींना

चुकीच्या वाटेने जाऊ नका

स्त्रीजिवन आहे काचेचे भांडे तडा त्याला घालवू नका


साहित्याला गुण द्या
लॉग इन