मन
मन
1 min
337
रे मना कुठे कुठे तू फिरे
पाहिले जे तू नाही कोणा दिसले
घेतोस उंच भरारी कोणत्याही क्षणी
स्थिर कधी कुठे ना गाव तुझे वसले
लपवून सुखदुःखाच्या खुणा हृदयात
होतात तीव्र वेदना आठवणीत
तू असा रमतो घालीत राहतो साद कुणा
मनामनाचे नाते गुंफले मनीच्या भावना डोळ्यात
तुझ्या ओठांनी जरी शब्द शिंपले
ओढ मनी भेटीची तुझ्या मन असे का उतावळे
थांबत नाही विचार तुझे कसे मांडू भाव मनीचे
अबोल नेहमी नयन तुझे ऐक तू माझ्या मना
नको शोधू तू जुन्या खुणा
ज्या वाटेला अर्थ नसे त्या
गावी तू जाऊ नको ना
