एक नातं प्रेमाचं
एक नातं प्रेमाचं
1 min
708
ऎक माझी कथा
कृष्णाची मी राधा
सांगू कशी व्यथा
स्वभाव भोळा साधा
रोज गोपिका सोबत
माझ्या वाट पाहते
यमुनातीरी वेड्याला
ना भान त्याचे
बासरी वाजवीत गायी चारी
किती रुसू मी त्याच्या पायी
बासरीची किमया सारी गोड
सूर ऐकून तिचा अवघे गोकुळ भुलते
भारी बासरीची अवीट गोडी
राधेलाही मोहात पाडी प्रेमाची
ही रीतच वेडी
राधेचाही रुसवा सोडी कृष्णही
लावे लाडीगोडी
दोघांची ही प्रीतच वेडी
कृष्णाच्या श्वासात जोडी
राधेच्या हृदयाची बेडी
दुनियेला शिकविती प्रेमाची जनरिती
सात फेऱ्याविनाही जुळतात जन्मोजन्मीची नाती
