नवीन वर्षाची किती असायची आतुरता
नवीन वर्षाची किती असायची आतुरता
1 min
386
नवीन वर्षाची किती असायची आतुरता
यावेळी मात्र नाही उत्सुकता
नको झालेय ह्या वायरसला पाहता
कशी उभारू वाटेल गुढी प्रत्येकाला भरलीय धास्ती
संपणार कधी हे संकट बसावे लागतेय घरात जबरदस्ती
आपले ठीक आहे हो पण काय करावे त्यांनी
ज्यांचे आहे हातावरचे पोट ज्यांना नाही घरदार त्यांनी
कसे काढावे दिवसरात सगळ्यांना करते एक विनंती
प्रत्येकाने समजून घ्या संकट परिस्थिती आहे खूपच बिकट
प्रत्येकाने जर पाळला नियम दरवर्षी उभारू गुढी हसत
