STORYMIRROR

Sunita Ghule

Others

5.0  

Sunita Ghule

Others

रंग होळीचे

रंग होळीचे

1 min
2.3K


सप्तरंगी चिंब

तनमन डोले

स्पर्श साजणाचा

शामरंगी न्हाले।


आनंद सांडतो

होळीच्या रंगात

मन पाखराशी

वसंत संगीत।


धुंदी ही आगळी

सर्वांगी चढली

रंगाने होळीच्या

रागिनी छेडीली।


देहभान कुठे

रंगी रंगताना

राधा मी झाले

होळी खेळताना


आवेग श्वासात

किमया रंगांची

मोरपिसी जादू

सावळ्या मेघांची।


उत्साह,उमेद

उत्सव रंगांचा

विसरी नैराश्य

रंग हा होळीचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन