STORYMIRROR

Shila Ambhure

Others

3  

Shila Ambhure

Others

रंग होळीचे

रंग होळीचे

1 min
736




आवडती मज ,होळीचे ते रंग,

रंगात भिजुनि, चिंब झाले अंग।।धृ।।


घेऊनिया दोन्ही, हाती रंग लाल,

रंगविले तू रे, माझे गोरे गाल,

लपुनिया येशी ,न्यारा तुझा ढंग।।1।।


प्रेमरंगी तुझ्या, भिजले मी भोळी,

करिते साजिरी ,रोज बाई होळी,

सावरु कसे मी, झाले कशी दंग।।2।।


जीवनात यावी, रोज अशी वेळ,

खेळावा वाटतो, रंगांचा हा खेळ,

खेळ माझा कुणी, करू नका भंग।।3।।


काय झाली जादू ,प्रेमाची किमया,

गोकुळ भासते, मजला दुनिया,

राधिका तुझी मी, तू माझा श्रीरंग।।4।।


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ