रंग दुनियेचे बदलले
रंग दुनियेचे बदलले
1 min
11.7K
रंगबेरंगी दुनियेची आताशी
काय झाली ही कहाणी
रंगावरून झोन ठरले बाधेचे
उरलं ना कुठंच आबादाणी.
लाल रंगाची धास्ती मोठी
जीवाची आशा ठरतेय खोटी.
विषाणू इवलासा ठरला डेंजर
हरलीत सत्तास्थाने मोठमोठी.
केशरी रंग जरा दमाचा वाटे
तरुन जाईल नाव खात्री कुठे?
सेवेची संधी आली मनुजा तुला
काळजी घेऊन तुडव हे काटे.
हिरव्या रंगात मनाला शांती मिळे
उखडून निघावीत विषाची मुळे.
जग व्यापले अवघे अनामिक भितीने
घरीच सुरक्षा आता सर्वांना कळे.
