रम्य ते बालपण
रम्य ते बालपण

1 min

216
काव्यप्रकार दशाक्षरी
बालपणीचा काळ सुखाचा
खेळ गप्पा गोष्टी रंगण्याचा
निर्व्याज मन निर्मळ गप्पा
चिंचा बोरे आवळे खाण्याचा
हसू ओठावरी अल्लडसे
मन निर्मळ ते धवलसे
आगळीच दुनिया रमवे
जाण दुनियेची मुळी नसे
नसे शिरी ओझे अभ्यासाचे
हुंदडणेच माहित असे
मैत्रीची रीत आगळी असे
जिवश्च-कंठश्च मैत्री असे
गोष्टी चांदोबा परीराणीच्या
अल्लाउद्दीन जादू दिव्याच्या
गोष्टी ऐकता स्वप्नकथांच्या
रंग चढे नव कल्पितांच्या
निखळ आनंद बालपणी
आता उरल्या त्या आठवणी
गेले ते दिन गेले म्हणूनी
आठवांतचि जाते रमूनी