रम्य ते बालपण
रम्य ते बालपण
1 min
260
धांडोळा बालपणाचा
सुखद आठवणींचा
सख्यांची सय येता
आठव चिंचा बोरांचा
नाही चिंता नाही दुःख
रम्य असे बालपण
कुटुंबियांच्या प्रेमाने
चिंब भिजे माझे मन
सख्यांसवे भातुकली
मजेने अनुभवली
पसारा खूप करता
मायमाऊली आवरी
सहलीला जायचो
जवळच्या ठिकाणाला
गप्पा चेष्टा कोडी गप्पा
ऊत येई हसण्याला
नसे स्पर्धा नसे इर्ष्या
नसे महत्त्वाकांक्षा
एकदिलाने वागता
स्वर्गसुखचि हाता
मागे वळून पाहता
रम्य बालपण गेले
मनी सारखे येते
गेले ते दिन गेले
