रमजान ईद
रमजान ईद

1 min

3.1K
ईद हो आनंदI फित्र असे दानI
मापदंड अन्नI शरीयत॥१॥
नववा महिना| तोच रमजान|
ते चंद्रदर्शनI रोजेदारा॥२॥
रमझचा अर्थ| असतो जाळणेl
रमजान म्हणे| पापे जाळा॥३॥
धर्माचा पाचवा| आधारस्तंभ हाI
स्वर्गाचे दावी हाI द्वार खुले॥४॥
कुराणाच्या सुरा| पैगंबर सांगेI
मिळे ईदी संगेI शिरखुर्मा॥५॥
शत्रू मित्र असोI गळाभेट होईI
उद्यालाही येईI बासी ईद॥६॥