रक्षाबंधन
रक्षाबंधन

1 min

112
आला सण रक्षाबंधनाचा
बंधू नि भगिनीच्या प्रेमाचा
असो दूर कितीही अंतर
वात्सल्यात पडेना अंतर
रक्षा करावी नित्य बंधूने
बहिण दे स्मरण राखीने
द्रौपदी श्रीकृष्ण नाते स्मरे
मानल्या भावाचे बंध खरे
जाती-धर्म असो कोणताही
राखीने बद्ध मानवताही
तैनात सीमेवर जवान
सुरक्षित देशात आपण
दुर्बळाचे करावे रक्षण
सांगतो राखी पौर्णिमा सण