STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

रजनी

रजनी

1 min
187

काळोखाच्या रजनीमधूनी

झरझर जाती चोरपाऊले

नीती-अनीती ठाव न त्यांना

पोटासाठी काहीही करे (१)  


गोड अल्लड सानुकली

खेळ खेळी दिवसभरी

चिऊकाऊच्या गोष्टी ऐकत

रजनी रंगे बाळाची   (२)


प्रेमभावना मनी उसळती

प्रेमिक झुरती मनामधी

रात्र युगांची भासतसे

आस त्यांना मीलनाची  (३)


मुग्ध नववधू बावरते

साजण भेटीने मोहरते

रात्र रंगते प्रेमाने

निशाच त्यांना भावतसे  (४)


वरदान ही पतीपत्नींना

छळते ती विरहिणींना

अशी रजनीची रुपे नाना

आगळी वेगळी भासे मना


Rate this content
Log in