रीती ओंजळ राहिली...
रीती ओंजळ राहिली...
परोपकाराच्या दारी
ओढ माणसा लागली...
हितकारी माणुसकी
जपण्यास रे धावली... ।।१।।
स्वार्थापायी बघ कधी
देवा नाही रे पूजिले...
मिथ्या अंधश्रद्धेपायी
कुणा नाही डावलले... ।।२।।
जगी बघता पापास
स्वार्थी ओंजळ भरली...
बदलले काही लोक
साथ विचारी हरली... ।।३।।
झाला एकाचा संसर्ग
दुसऱ्यास रे लुटले...
पापी जगाचा रे अंत
देव करण्या मुकले... ।।४।।
आता रिते झाले प्राण
आली माघारी पावली...
अंती असंख्य प्रयत्नी
रीती ओंजळ राहिली... ।।५।।
नाही होत बघा फक्त
विषाणूंचा रे संसर्ग...
अविचारी माणसाची
साथ रे घातक स्वर्ग... ।।६।।
