STORYMIRROR

Snehal Gapchup

Others

3  

Snehal Gapchup

Others

रघुराया

रघुराया

1 min
128

रामा तुझ्या नामामध्ये वेगळा आनंद. 

तुझे नाम घेणे हाचि लागलासे छंद. 

कोशल्येच्या  तान्हुल्या तू केले मंत्रमुग्ध. 

रघुवंशाचा तू कुलदीपक, सीतेचा तू रघुराया. 

तुझ भक्तीने हनुमंत भारला, तारत असे सर्व पामरा. 

शबरीची ती वेडी माया, बोरन बोर चाखून द्याया. 

लक्षुमणाला शक्ती लागली, तुझ्या मनीचा ठाव घ्याया. 

पादुका तुझ्या शिरी घेऊनि भरत पावला सर्व सुखःह्य. 

तू युक्तीने सेतू साधला, अधर्माचा शीर छेदाया. 

खारीचा ही वाटा तू न जाऊ दिला फोल राया. 

रामेश्वर ते धन्य जाहले पाहूनी शक्ती-भक्तीच्या ह्या मिलना.

तारणहार तूची दशरथ नंदना.


Rate this content
Log in