रेशमी धुके
रेशमी धुके
प्रिये
ये ना रेेेशमी धुक्याची
मलमल बाजूला सारून
अलगद पाड पाऊस प्रीतीचा
मला ही होता येईल ओलाचिंब
बघ आभाळात तारकांचे पुंज
ईशारा करत आहेत
खाली अंथरलेल्या हिरव्या गालीच्यात
रंगवावी उद्याचि हिरवी स्वप्ने म्हणून
बघ क्षितीजावर उमटले इंद्रधनू
पहात आहेत काळजात घर करून
आणि पक्षांच्या रांगा करत आहेत
फिरून फिरून विहार मोकळ्या
आकाशात फेर धरून
मलाही वाटते आज करावे मोकळे मन
वेेचावे कण कण आणि करावी
तुुुुझ्या मोकळ्या केसांची वेणी
तो बघ गुलाब तुझ्या वेणी वर
खुुलन्यासाठी कसा लाजतो आहे
आता मातीलाही गंध सुटलाय
चल आवरून घे रेशमी धुके ओसरलीत प्रिये
पुुन्हा परत येशिल ना एकदा
रेेेशमी धुुक्यातून सोनेरी साद घालीत
