रेशीम गाठ
रेशीम गाठ

1 min

12.1K
क्षणभर सृष्टीने हिरवागार शालू पांघरावा एवढीच तुझी साथ,
नाजूक असते रे रेशीम गाठ,
तुझ्यासाठी असावे बंधन
माझ्यासाठी सात जन्माचे
वचन त्यात,
नाजूक असते रे रेशीम गाठ,
तुझा विश्वासाचा आधारावर
घर दार सोडावे, तू क्षणात परके करावे,
चुकते कुणाचे यात,
नाजूक असते रे रेशीम गाठ
देवाने दिलेला आशीर्वाद
तू माझा मी तुझी एवढेच वचन त्यात,
नाजूक असते रे रेशीम गाठ,,
नको इतकं वेढे मारू धाग्याला
भुरळ पडेल नात्याला आज,
नाजूक असते रे रेशीम गाठ,,
झाले स्वार्थी नात्यासाठी
काय बिगडले सांग ना त्यात
नाजूक असते रेशीम गाठ........
नाजूक असते रेशीम गाठ..........